युवकाचा रोडरोलरखाली दबून मृत्यू, कुटुंबीयांची कंपनीवर कारवाईची मागणी** **सोनपेठ-आंबेजोगाई रस्त्याच्या रुंदीकरणादरम्यान झालेल्या दुर्दैवी घटनेत युवकाचा जागीच मृत्यू**मुख्य संपादक अशोक गलांडे दिनांक 20 फेब्रुवारी 2025सोनपेठ-आंबेजोगाई रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान एक गंभीर दुर्घटना घडली, ज्यात यश कंट्रक्शन कंपनीच्या रोडरोलरखाली येऊन २७ वर्षीय युवराज दत्तात्रय राऊत याचा जागीच मृत्यू झाला. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबीयांनी कंपनीविरोधात कारवाईची मागणी केली आहे.परळी तालुक्यातील नाथरा फाट्याजवळ सुरु असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामात युवराज राऊत यांचा सहभाग होता. गुरुवारी (ता. २०) सकाळी १० वाजेच्या सुमारास रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असताना, अचानक युवराज रोडरोलरखाली आले. रोडरोलरचा दडपण इतका भयानक होता की त्याचे शरीर चपटे झाले होते व डोक्याचा भाग पूर्ण चेंदामेंदा झालेला होता .घटनेची माहिती कुटुंबीयांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. संतप्त कुटुंबीयांनी काही वेळ रास्ता रोको करत ड्रायव्हर आणि कंपनी वर करवायची मागणी केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे.कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, योग्य सुरक्षा उपायांची पूर्तता न करता काम सुरू करण्यात आल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. यश कंट्रक्शन कंपनीवर कारवाई करण्याची आणि कुटुंबीयांना योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत परळी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
