मुख्य संपादक अशोक गलांडे माऊली न्यूज नेटवर्क.

** भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती**
आ.धसांच्या ताफ्यात महाविकास आघाडीचे नेते , पुढारी, कार्यकर्त्यांच्या गाड्याने राज्यभर चर्चेला आले उधाण.
राज्यात सत्येत असलेल्या महायुतीतील भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी २२ फेब्रुवारी रोजी मस्साजोग सरपंच संतोष देखमुख व परळीतील महादेव मुंडे हत्याकांड प्रकरणी आ .सुरेश धस यांचा दौरा होता. या भेटीदरम्यान, धस यांच्या सोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती चर्चेला उधाण देणारी ठरली. त्यांच्या दौऱ्यामुळे परळीतील राजकीय वातावरण तणावपूर्ण झाले आणि विरोधकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. सुरेश धस यांच्या भेटीच्या वेळी परळी आणि सिरसाळ्यात मुंडे आणि कराड गटाच्या समर्थकांनी निषेध व्यक्त करत काळे झेंडे दाखवले. परळीमध्ये विशेषत: या विरोधकांनी धस यांना काळे झेंडे दाखवून विरोध नोंदवला मात्र सिरसाळ्यात या विरोधाचा एक वेगळाच प्रकार समोर आला, मुंडे समर्थक आमदार धसांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत होते त्यावेळी ताफ्यातील एका काळया स्कार्पिओ गाडीतील कार्यकर्त्याचा संयम सुटून त्याने शिवी दिल्याने मुंडे समर्थक आणि आमदार धस यांच्या सोबत असलेल्या तुतारी गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. या घटनेनंतर मुंडे समर्थकांनी त्या काळया स्कार्पिओ गाडीवर दगड भिरकवण्याचा प्रयत्न देखील केला. या घटनेत स्थानिक व परळी शहर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला, पण आंदोलकांशी त्यांची शारीरिक झटापट झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली.या घटनेनंतर राजकीय वातावरणात वेगळ्या चर्चेला उधाण आले. खासकरून मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यातील वाद तीव्रतेने वाढले आहेत, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एकीकडे राजकीय विश्लेषक आणि नागरिक या सर्व घटनेवर चर्चा करत असतानाच दुसरीकडे सुरेश धस आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जनतेला कोणता संदेश दिला आहे? विशेष म्हणजे, सुरेश धस यांनी सुरवातीला कम्युनिस्ट पक्षात असलेल्या आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केलेले व विधानसभा निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केलेले उत्तम माने यांच्या बहीण प्राध्यापक उषा माने यांच्या सिरसाळा येथील घरी भेट दिली. यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व परळी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख आणि काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल जाधव यांच्यासह दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या दौऱ्यामुळे परळी आणि आसपासच्या राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला असून, आगामी निवडणुकीच्या संदर्भात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यातील कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात पडले आहेत की त्यांचे भविष्य काय असणार आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस व महाविकास आघाडमधील प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याने धस समर्थक आणि मुंडे समर्थक यांच्यातला संघर्ष आगामी काळात अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

चौकट.
आमदार सुरेश धस यांच्या ताफ्यात महाविकास आघाडीचे नेते,पुढारी व कार्यकर्ते यांच्या गाड्या.
आधीचे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले व परळी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडूंत उमदेवार असलेजे राजेसाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उत्तम माने,काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अनिल जाधव यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित तर होतेच परंतु आमदार सुरेश धस यांच्या ताफ्यात देखील बहुतांश गाड्या ह्या महाविकास आघाडीचे नेते,पुढारी व कार्यकर्ते यांच्या असल्याने आगामी निवडणुकीत परळी तालुक्यातील परिस्थिती बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

