परळीत कराड – मुंडे समर्थकांनी धसांना दाखवले काळे झेंडे तर सिरसाळ्यात ताफा आडवत घातला राडा ;आ.धस परळीची बदनामी करत असल्याचा आरोप
अंदोलकांची पोलीसांशी झटापट , गुन्हा दाखल
सिरसाळा प्रतिनिधी
: मस्साजोग सरपंच संतोष देखमुख व परळीतील महादेव मुंडे हत्याकांड प्रकरणी आ .सुरेश धस यांचा दौरा असतांना दरम्यान आष्टी कडे वापस जात असतांना कराड – मुंडे समर्थकांनी परळीची बदनामी आ .धस करत असल्याच्या कारणातून धसांना परळी ,सिरसाळ्यात काळे झेंडे दाखवून निषेध केला .सिरसाळ्यात मात्र कराड – मुंडे समर्थकांनी काळे झेंडे दाखवत राडा घातला , ताफ्यातील एका गाडीवर दगड भिरकवण्याचा प्रयत्न झाला , पोलिसांनी आवर घालण्याचा प्रयत्न केला असता यातील अंदोलकांची पोलिसांशी झटापट झाली , या घटनेने सिरसाळ्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.यातील तिघा विरुद्ध सिरसाळा पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काल दुपारी परळी येथे महादेव मुंडे यांच्या कुटुंबास आमदार सुरेश धस यांनी भेट दिली . महादेव मुंडे खून प्रकरणात आका आणी पोलीस यांचा हात असल्याचे धस म्हणाले आहेत. भेटी दरम्यान मयत महादेव मुंडे यांची पत्नी यांनी घटनेचा आणि स्थानिक पोलीस प्रशासनाचा या बाबत ची काय भूमीका आहे हे सर्व धसांना सांगितले. या ठिकाणाहून धस सिरसाळा मार्गे जात असतांना परळीत दहा ते बारा कराड – मुंडे समर्थकांनी काळे झेंडे दाखवत परळीची बदनामी आमदार धस करत असल्याच्या कारणावरुन निषेध केला . सिरसाळ्यात मात्र निषेधाला वेगळे वळण लागले, ताफ्यातील एका कार्यकर्त्याची आणि अंदोलकाची शाब्दिक चमक उडाली यात एका अंदोलकांने थेट दगड उचलून भिरकवण्याचा प्रयत्न केला . हा प्रकार पोलीस प्रशासना समोर घडला आहे. पोलिसांनी यातील अंदोलकांना ताब्यात घेतले होते. रात्री तिघांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
● पोलीसां समोर दगड उचलण्याची मजल जाते कशी – आ .धस
: यांची गुंडशाही अजून संपलेला नाही असे सिरसाळ्यात घटनेवरून दिसत असल्याचे आमदार धस यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे .
पोलीसां समोर दगड उचलण्याचा प्रयत्न केला जातो हा खुप गंभीर प्रकार आहे. सिरसाळ्यातील १७ ग्रामपंचायत सदस्या पैकी १४ सदस्य गायरानात अतिक्रमणीत आहेत ,त्या पैकीच कोणीतरी ह्या प्रकरात असेल असे धस यांनी म्हटले आहे ते पुढे म्हणाले कि,धनंजय मुंडेना आम्ही काळे झेंडे आष्टीत दाखवू परंतु लोकशाही मार्गाने अंदोलन केले जाईल.
● आरोपी अटक होत नाहीत तो पर्यंत मि समाधानी नाही – ज्ञानेश्वरी मुंडे
– पाच सदस्यीय पथका द्वारे पोलीस महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करत आहेत, या तपासावर तुम्ही समाधानी आहात असे पत्रकारांनी विचारल्या नंतर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे म्हणल्या कि, पोलीस प्रशासनावर आम्ही समाधानी नाहीत आणी तपास यंत्रणा जेंव्हा आरोपींचा तपास लावतील तेव्हांच मि माझे कुटुंब समाधानी होऊ असे म्हणत त्या म्हणाला सोमवार पासुन पोलीस अधिक्षक कार्यालया समोर अमरण उपोषणास बसणार आहे.
मुंडे कुटुंबाच्या भेटी दरम्यान काय म्हणाले आ.धस
● महादेव मुंडे खून प्रकरणात अक्षम्य दुर्लक्ष पोलिसांनी केले आहे. महादेव मुंडे यांनी घेतलेले प्लाॅट कुणाच्या नावावर गेले ? आकाच्या संबंधित लोकांनी हे प्लाॅट घेतले, मग आकाचा हात असू शकतो
● भास्कर केंद्र, सचिन सानप गोविंद भताने हे लोक पोलीस वर्दीतील दरिंदे
● हे तीन पोलीस परळीतच का राहतात , ह्या हत्येत पोलिसांचा हात आहे का ?
●यातील तिन पोलीसांनी तर हत्या केली नाहीना ?
● किड्या मुंग्या सारखे लोक परळीत मारले जातात
● परळी बदनाम का होतेय याचा जरा विचार करा
● परळीचे पोलीस खुनं जिरवायले आहेत का ?पंधरा पंधरा महिने आरोपी सापडत नाही,
● जरीन पटेवाला पोलिसांच्या दारात मेला ,३५ लाखात प्रकारण मिटवले
● परळीतील पोलीस दल पुर्ण बदललं पाहिजे ,
● परळी संभाजी नगर पोलीस स्टेशन ला असलेला सचिन सानप शहर पोलीस स्टेशन मध्ये तपासाला कसा येतो ?
● सदरील पोलीस छोट्या आणी मोठ्या आका चे आवड
