
सिरसाळा प्रतिनिधी
रमजानच्या पवित्र महिन्यात लहान मुलांमध्येही उपवासाचा उत्साह दिसून येत आहे. सिरसाळा येथील पठाण कुटुंबातील सहा वर्षीय चिमुकली राबिया आसेफ पठाण हिने यंदा आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला. तिच्या या कामगिरीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
राबियाने पहिल्यांदाच रोजा ठेवल्याने तिचे कुटुंबीय खूप आनंदी आहेत. याप्रसंगी पठाण परिवाराच्या वतीने राबियाला शुभेच्छा देण्यात आल्या.विशेष म्हणजे, राबियाची मोठी बहीण आफिफा आसेफ पठाण (वय 8) आणि भाऊ आदिल खाजा पठाण (वय 12) यांनीही गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही उपवास पूर्ण केले.
लहान वयातच या मुलांनी दाखवलेली श्रद्धा आणि उत्साह कौतुकास्पद आहे.पठाण कुटुंबात रमजानचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. लहान मुलांनीही उपवास ठेवून रमजानचे महत्त्व जपले आहे. यावरून लहान वयातच मुलांमध्ये धार्मिक मूल्यांची रुजवणूक होत असल्याचे दिसून येते.
आणि हो, आपल्याला याप्रकारे महत्त्वाच्या बातम्या, सरकारी योजना, शासकीय योजना व शैक्षणिक योजनांची माहिती हवी असल्यास, आमच्या माऊली न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. तसेच व्हिडीओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका!
YouTube Channel :
https://youtube.com/@maulinewsnetworklive24tas?si=o0cDAOrEw_1hWg9M
तुम्हाला सरकाराच्या विविध योजनांची माहिती आणि शैक्षणिक योजनांसाठी वॉट्सॲप ग्रुप्स जॉइन करायचे असल्यास, खालील लिंकवर क्लिक करा:
माऊली न्यूज नेटवर्क ग्रुप:
https://chat.whatsapp.com/KLJnd2bA9XAFXtYGFnNPzK
दैनिक कार्यारंभ सिरसाळा ग्रुप:
https://chat.whatsapp.com/Inp91w2N6vBINH9Fbn9ywQ
कृपया या लिंकसह आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा!
धन्यवाद,
माऊली न्यूज नेटवर्क
मो: 9420015945, 8390027199, 9764468333

