
करेवाडीतील ‘त्या’ प्रियकराच्या मृत्यूचे गूढ उकलणार?
चार वर्षांनंतर पुन्हा होणार चौकशी; मा.उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश
मा.न्यायालयाने व्यक्त केली तपासातील त्रुटींबद्दल चिंता; राजकीय दबावाचाही संशय.
मुख्य संपादक अशोक गलांडे.
चार वर्षांपूर्वी करेवाडी (ता. परळी) येथे घडलेल्या एका युवकाच्या मृत्यूची रहस्यमय घटना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बाळासाहेब सुखदेव कावळे (वय ३०) या युवकाचा २१ ऑगस्ट २०२१ रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. 21 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 11 वाजता बाळासाहेब कावळे यांचा मृतदेह एका महिलेच्या घरामागे आढळून आला होता. हा अपघाती मृत्यू नसुन हा घातपात आहे असा आरोप मयताचे नातेवाईक पत्नी व भाऊ अरुण कावळे यांनी त्या वेळी केला होता. परंतु घटना घडून आठ दिवसां नंतर घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. सिरसाळा पोलीस स्टेशन मध्ये संशयीत प्रियशी विरुद्ध तक्रार दिली होती तत्कालीन पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला नाही , संबंधित नातेवाईक परळी न्यायालयात गेले तेव्हा परळी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश सिरसाळा पोलीसांना दिले होते , गुन्हा दाखल झाला परंतु तपासात काही आढळून आले नाही असे म्हणत सिरसाळा पोलीस प्रशासनाने प्रकरणास पुर्ण विराम दिला. मयताचे नातेवाईक भाऊ अरुण कावळे यांनी छत्रपती संभाजी नगर उच्च न्यायालयात सदरील प्रकारण दाखल केले ,या वरून मा.उच्च न्यायालयाने ह्या प्रकरणात सिरसाळा पोलीसांना पुन्हा चौकशी /तपास करण्याचे आदेशीत केले

याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड आकाश एकनाथराव मदने यांच्या मार्फत उच्च न्यायालयात क्रिमिनल रीट पिटीशन दाखल केली असता ॲड .अजित काळे आणि ॲड .साक्षी अजित काळे व ॲड .आकाश मदने यांनी प्रकरनाची खरी हकीकत उलघडुन दाखवली
नेमकं काय आहे प्रकरण?
२१ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ११ वाजता बाळासाहेब कावळे यांचा मृतदेह एका महिलेच्या घरामागे आढळून आला होता. सुरुवातीला त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. बाळासाहेब यास कान्नापुर, सिरसाळा येथील खाजगी दवाखान्यात दाखवले तेव्हा अधिकृत समजले कि,बाळासाहेब कावळे चा मृत्यू झाला आहे.नातेवाईक भाऊ व इतर याना वाटले कि, बाळासाहेब चा मृत्यू नैसर्गिक झाला आहे. पंरतु गावातून समजले कि,ज्या महिलेशी बाळासाहेब चे अनैतिक संबध होते त्या संशयीत महिलेच्या घरातून रात्री बाळासाहेब यास मृत अवस्थेत एका महिले सह इतर तीन जणांनी बाहेर आणून टाकले असल्याचे जबाबात म्हंटले होते, समजलेल्या गंभीर माहिती वरुन मयताचे नातेवाईक खडबडून जागे झाले. घटना घडल्या च्या तीन चार दिवसां नंतर सिरसाळा पोलिस स्टेशन येथे धाव घेतली. दरम्यान मयत बाळासाहेब चा अंत्यविधी झाला होता, मयताचा भाऊ अरुण कावळे याने दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटंले आहे कि, गावातील एका महिले सोबत बाळासाहेब कावळे याचे अनैतिक संबंध होते. घटनेच्या दिवशी रात्री १० वाजता च्या दरम्यान एका महिलेने संबंधित संशयीत महिलेच्या घरा समोर एका महिलेसह अन्य तिघे जणांनी बाळासाहेब यास उचलून टाकले असल्याचे जबाबात म्हंटले. या वरुन गावात खून झाल्याची चर्चा आहे. बाळासाहेब ह्या युवकाचे संबंधित संशयीत महिलेशी अनैतिक संबंध होते आणि हि महिला बाळासाहेब याचा काटा काढणार होती असे बोलल्या जात होते. घटनेच्या रात्री त्यांना त्या महिलेच्या घरासमोरून तिघांनी उचलून नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते. यावरून बाळासाहेब यांचा खून झाल्याची चर्चा गावात सुरू झाली होती.इतर प्रियकरांच्या मदतीने बाळासाहेब चा घात केला असल्याचे त्या वेळेस बोलल्या देखील जात होते. या प्रकरणी सिरसाळा पोलिस स्टेशन येथे मयताचा भाऊ अरूण कावळे याने लेखी तक्रार देऊन भाऊ बाळासाहेब चा खून झाल्याचा संशय व्यक्त केला होता, व घडला प्रकार सविस्तर तक्रारी अर्जात नमूद केलेला होता. मात्र, पोलिसांनी योग्य तपास न केल्याने त्यांनी मा.उच्च न्यायालयात धाव घेतली.
मा.उच्च न्यायालयाने सिरसाळा पोलीस स्टेशन ला काय दिले आहेत आदेश.
मुंबई मा.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सिरसाळा पोलिसांना १८ मार्च २०२५ पर्यंत या प्रकरणाचा फेर तपास करण्याचे आदेश दिले आहेत. मा.न्यायालयाने तपासातील त्रुटी आणि राजकीय दबावामुळे झालेल्या चुकांची गंभीर दखल घेतली आहे.न्यायमूर्ती विभा कनकनवाडी आणि न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. फिर्यादी आणि साक्षीदारांवर आरोपींनी दबाव टाकला आणि पोलिसांना तपासात योग्य पद्धतीने काम करू दिले नाही, असा आरोप अरुण कावळे यांनी केला होता.पोलिसांनी या प्रकरणात ‘सी’ समरी अहवाल सादर केला होता, मात्र मा.न्यायालयाने तो स्वीकारला नाही. त्यामुळे न्यायालयाने पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.या आदेशामुळे बीड जिल्ह्यातील सिरसाळा पोलीस ठाण्याच्या तपासाला गती मिळेल आणि आरोपींविरुद्ध योग्य कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे.
