फिनिक्स अभ्यास केंद्रात शिवाजान्मोत्सव साजरा करण्यात आला.

सिरसाळा प्रतिनिधी येथील फिनिक्स अभ्यास केंद्रात शिवाजान्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना शिवचरित्र सांगत असताना ज्ञानज्योती आईसाहेब बहु. सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व फिनिक्स अभ्यास केंद्र सिरसाळा चे संचालक ॲड. श्रीहरी कांबळे यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी शिवचरित्रातून व्यवस्थापन कौशल्य शिकून घ्यावे. पुढे बोलताना ॲड. श्रीहरी कांबळे म्हणाले की, ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना स्पर्धकांकडे उपलब्ध असलेले अभ्यास साहित्य आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना करावी लागणारी कसरत तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा संकल्प केला तेंव्हाची परिस्थिती व प्रतिकूल असलेली परिस्थिती याचा विचार करून ज्या प्रमाणे छ. शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती धर्माचे मावळे एकत्र केले आणि अचूक व्यवस्थापन करून स्वराज्य निर्माण केलं. तेंव्हा कुठे सार्थ म्हणता येत , शिवरायांच्या राज्या मध्ये कधीच नव्हती वान , आनंदाने नांदत होते हिंदू-मुसलमान. अगदी असेच स्वराज्य विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाच्या जोरावर वेळेच व्यवस्थापन करून निर्माण करावे. यावेळी कार्यक्रमास साई इंटरनेट कॅफे चे मालक तुकाराम दहिफळे, इंजी. रोहन राठोड, नवउद्योजक अभिषेक मारावळ , व्यंकटेश पेचफुले , अनिकेत मुळे , साहिल चव्हाण, विश्वजित खोडसे, प्रथमेश गोरे, केशव दराडे, प्रदीप कांदे, बसवंत लव्हराळे , शिवा जाधव , गोविंद गायकवाड, कैफ आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी साहित्य वाटप करण्यात आले तसेच जिलेबी वाटून आनंद साजरा करण्यात आला.
