
शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करण्यास सक्षम करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रभावीपणे सोलार पंप योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ 5% ते 10% लाभार्थी हिस्सा भरावा लागतो, तर उर्वरित रक्कम शासनाकडून दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना 90% ते 95% पर्यंत अनुदानाचा लाभ मिळतो.
महाराष्ट्रात सध्या मागेल त्याला सोलार पंप योजना राबवली जात आहे. पिएम कुसुम, महावितरण आणि मागेल त्याला सोलार पंप योजना अंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करून पेमेंट करण्याचा पर्याय दिला जातो. पण पेमेंट केल्यानंतर अर्जाची पडताळणी होणार आहे.
सिररसाळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आमदार सुरेश धस यांना कार्यकर्त्याकडून काळे झेंडे दाखवत तप्यातील गाडीवर दगड मारण्याचा केला प्रयत्न तनावाची परिस्थिती
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही अटी आणि नियम आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पूर्वी सोलार पंप घेतला असेल, ज्यांच्या नावावर विजेचे कोटेशन असेल, ज्यांच्याकडे सामाईक विहीर किंवा जमीन असेल आणि त्या विहिरीवर वीज कनेक्शन असेल, अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे.

पेमेंट करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी त्यांच्या 7/12 उताऱ्यावर विहीर किंवा बोरवेलची नोंद आहे का, त्यांच्याकडे वीज कनेक्शन नाही ना, तसेच त्यांनी पूर्वी सोलार पंप घेतलेला नाही याची खात्री करून घ्यावी.

जर शेतकऱ्यांनी पेमेंट केल्यानंतर काही कारणास्तव त्यांचा अर्ज बाद झाला, तर त्यांना पैसे परत मिळण्यास वेळ लागू शकतो. तसेच या रकमेसाठी कोणतेही व्याज दिले जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व अटी पूर्ण होत असल्याची खात्री केल्यानंतरच पेमेंट करावे.
